Mumbai -Goa Highway Saam TV
Video

Mumbai - Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं काम अपूर्ण; टोल नाके मात्र पूर्ण, शरद पवार गट आक्रमक | VIDEO

Ravindra Chavan : मुंबई-गोवा महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नसतानाही रायगड हद्दीतील सुकेळी खिंड आणि चांढवे येथील टोल नाके बांधून पूर्ण झाले आहेत. जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी टोल नाके तोडण्याचा इशारा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. नव्याने तयार झालेल्या रस्त्यावरही पुन्हा खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. अशा स्थितीत प्रशासन आणि बांधकाम ठेकेदारांना टोल नाके पूर्ण करण्याची घाई झालेली दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यातील सुकेळी खिंड आणि चांढवे येथील टोल नाके पूर्णपणे बांधून तयार करण्यात आले आहेत. मात्र रस्त्याची दुरवस्था पाहता, टोल घेण्याचा नैतिक अधिकारच नसल्याचा सवाल आता उपस्थित होत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाली आहे. जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी टोल नाके तोडण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता रस्त्याच्या कामाला गती मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT