Lalbaugcha raja News SaamTv
Video

Lalbaugcha Raja : लालबागचा राजा विसर्जन मिरवणूकीसाठी सज्ज !

Mumbai Ganeshotsav : १० दिवसांच्या मुक्कामानंतर आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आकर्षक फूल माळांच्या सजावटीसह लालबागचा राजा विसर्जन मिरावणूकीसाठी मार्गस्थ होण्यास सज्ज झाला आहे.

Saam Tv

१० दिवसांच्या सेवेनंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मुंबईत विसर्जन मिरवणूकीसाठी लालबागचा राजा सज्ज झाला आहे. मंडळाकडून लालबागच्या राजाला आकर्षक सजावट केली आहे. फूल माळांनी सजवून आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते देखील सज्ज झाले आहेत.

गेल्या १० दिवसांपासून भाविक भक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे. लाखोंच्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. आज भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. सकाळपासूनच मंडळांचे मानाचे गणपती विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. लालबागच्या राजा देखील थोड्या वेळातच विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे. मंडळाकडून लालबागच्या राजाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. शेवटची आरती झाल्यानंतर राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे. साधारणत: सकाळी ११ वाजता आरती नंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhruv Rathee : "पोलिसांनी माझं अपहरण केलं..." 'त्या' दिवशी काय घडलं? ध्रुव राठीने सर्व सांगितलं; पाहा VIDEO

Kalyan-Latur Highway: मुंबईवरून लातूरला पोहचा फक्त ५ तासांत, तयार होतोय नवा एक्स्प्रेस वे; कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार?

Chanakya Niti : ऑफिसमध्ये प्रत्येकाच्या आवडीचे असतात असे लोक; त्यांच्यात असतात हे ७ खास गुण

Maharashtra News Live Update: ओबीसी हक्कांच्या लढ्याला नवी दिशा देण्यासाठी नागपुरात राष्ट्रीय रणनीती बैठकीला सुरुवात

PF मधून पैसे काढणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! TDS सवलतीसाठी आता भरावा लागणार नवीन फॉर्म

SCROLL FOR NEXT