मुंबईमध्ये अल्पवयीन मुलांना तरुण-तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळ असलेल्या पालिकेच्या उद्यानात हा संतापजनक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एक तरुण आणि तरुणी उद्यानात फोटो काढत असताना ८ ते १० अल्पवयीन मुलांनी त्यांची छेड काढली. या वादातून या तरुण-तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्या, काठी अन् पट्ट्याने त्यांना मारहाण करण्यात आली.
शुक्रवार दुपारची ही घटना असून या तरुण तरुणीच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसानी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडिओ काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून समाज माध्यमात तो प्रचंड व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे. घाटकोपर पोलिसांनी तक्रार दाखल होताच ८ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी या मुलांच्या पालकांना नोटीस पाठवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.