leopard in Mumbai CCTV Footage goes Viral saam tv
Video

मुंबईत भरवस्तीत बिबट्या, अंधारातच केली शिकार, CCTV VIDEO व्हायरल

bibtya spotted in mumbai residential area : मुंबईसारख्या ठिकाणी बिबट्या मुक्तपणे संचार करत असल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Nandkumar Joshi

मयूर राणे, मुंबई , साम प्रतिनिधी

मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील सरदार तारासिंग उद्यानाजवळ असलेल्या साई प्रस्थ येथे बिबट्या आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा बिबट्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून साई प्रस्थ येथे येऊन कुत्र्याची शिकार केली. या भागात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसून आल्याने आता नागरिकांची झोप उडाली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला अनेक ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने अनेकदा शिकारीच्या शोधात बिबटे नागरी वस्तीत येतात. घाटकोपर ते मुलुंड या भागात अनेकदा बिबट्यांनी नागरिकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत.

साई प्रस्थ येथे आलेल्या बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. मात्र त्या ठिकाणी रात्री अपरात्री एखादी व्यक्ती असती तर त्याची शिकार झाली असती, अशी भीती व्यक्त केली जात असून, परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.

क्लिक करा आणि बघा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Fact Check: २५५० रुपये द्या अन् ५ लाख घ्या, PM मोदींच्या नावाने मिळतंय कर्ज? सरकारने दिली महत्वाची माहिती

देशाच्या राजकारणात खळबळ; राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देणार राजीनामा?

Ind vs Afg : भारताविरुद्ध वनडे, कसोटीसाठी टीम अफगाणिस्तान जाहीर; हुकमी एक्का संघाबाहेर

Shahi paneer Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही पनीर; पाहुण्यांनाही आवडेल खास रेसिपी

SCROLL FOR NEXT