Ladki Bahin Yojna Scam News SaamTv
Video

Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणी'वर भावांचा डोळा ?

Chhatrapati Sambhajinagar News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचे समोर आले आहे.

Saam Tv

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या १२ भावांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचा प्रकार समोर आलं आहे. कन्नडच्या महिला व बालकल्याण विभागाच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्या १२ जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकाराने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच साताऱ्यामधील एकाच व्यक्तीने या योजनेचे तब्बल ३० अर्ज करुन मोठा घोटाळा केल्याचं उघड झालं होतं. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा खळबळ उडवली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत ९२ हजार ९८ अर्ज भरण्यात आले आहेत. त्या अर्जाची ३० ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर भलताच प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी असे अर्ज केल्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT