Mukesh Ambani 
Video

Mukesh Ambani : मुकेश अंबानींनं घेतलं तब्बल २५,००० कोटींचे कर्ज, ५५ बँकांनी दिलं सिंडिकेटेड लोन

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने २५,००० कोटी रुपयांचे परदेशी कर्ज घेतले आहे. ५५ बँकांनी एकत्र येत दिलेले हे कर्ज भारतातील २०२५ मधील सर्वात मोठा सिंडिकेटेड लोन व्यवहार ठरला आहे. हे कर्ज विस्तार योजना व जुन्या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरले जाणार आहे.

Namdeo Kumbhar

Mukesh Ambani syndicated loan : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने २.९ बिलियन डॉलर म्हणजे २५,००० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. ५५ बँकांनी सिंडिकेट पद्धतीने एकत्र येत मुकेश अंबानी यांना कर्ज दिले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हे भारतातील एका वर्षातील सर्वात मोठे विदेशी कर्ज आहे. या कर्जाला ५५ बँकांनी संयुक्तपणे मंजुरी दिली असून, यामुळे हे आशियातील २०२५ मधील सर्वात मोठे सिंडिकेटेड लोन डील ठरले आहे. हे कर्ज कंपनीच्या विस्तार योजनांसाठी आणि २०२५ मध्ये येणाऱ्या २.९ बिलियन डॉलरच्या कर्ज परतफेडीसाठी वापरले जाईल.

सिंडिकेटेड लोन म्हणजे काय?

सिंडिकेटेड लोन म्हणजे अनेक बँका एकत्र येऊन एका कंपनीला कर्ज पुरवतात. या व्यवहारात ५५ बँकांनी सहभाग घेतला, ज्यामुळे रिलायन्सच्या आर्थिक विश्वासार्हतेची पुष्टी होते. हे कर्ज दोन भागांमध्ये विभागले गेले आहे: २.४ बिलियन डॉलर आणि ६७.७ बिलियन जपानी येन (सुमारे ४६२ दशलक्ष डॉलर).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT