ST Bus SAAM TV
Video

ST Bus : पुणे-मुंबई प्रवास महागला, एसटीच्या तिकिटात वाढ, पाहा कोणत्या शहराला जायला किती तिकिट? |VIDEO

Maharashtra ST Bus : एसटी महामंडळाने दिवाळीसाठी 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत ही भाडेवाढ लागू असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळीपूर्वी एसटी प्रवाशांना महागाईचा फटका बसणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस या भाडेवाढीपासून वगळण्यात आल्या आहेत.मात्र, इतर सर्व प्रकारच्या बसेससाठी ही दरवाढ लागू असेल. भाडेवाढीमुळे सामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असला तरी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक गाड्या सोडण्याची तयारी केली आहे.

भाडेवाढीनंतरचे तिकिट दर : -

मुंबई - मालवण ( शिवशाही )

सध्याचे दर १३०० रुपये

दिवाळीत १४०० रुपये

मुंबई - जळगाव (स्लिपर)

सध्याचे दर ११०० रुपये

दिवाळीत १२५० रुपये

मुंबई - लातूर ( साधी )

सध्याचे दर ९०० रुपये

दिवाळीत १००० रुपये

मुंबई - संभाजीनगर ( साधी )

सध्याचे दर ८०० रुपये

दिवाळीत ९०० रुपये

मुंबई - जालना ( साधी )

सध्याचे दर ८०० रुपये

दिवाळीत ९०० रुपये

मुंबई - सोलापूर ( साधी )

सध्याचे दर ७५० रुपये

दिवाळीत ८५० रुपये

मुंबई - सांगली ( साधी )

सध्याचे दर ७३० रुपये

दिवाळीत ८०० रुपये

परळ - कोल्हापूर ( साधी )

सध्याचे दर ६४० रुपये

दिवाळीत ७०० रुपये

मुंबई - रत्नागिरी ( साधी )

सध्याचे दर ६०० रुपये

दिवाळीत ७०० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

Sleep Routine: दररोज ८ तास झोपल्यानंतरही प्रकृती बिघडू शकते? Sleeping Time म्हणूनच महत्वाचा

SCROLL FOR NEXT