Sanjay Raut SaamTV
Video

Sanjay Raut : राज्यात हेलिकॉप्टरने पैसे जातात, त्यांना कोण अडवणार? राऊतांचा घणाघाती हल्ला

Sanjay Raut Press Conference : राज्यात आता पोलिसांची वाहने देखील तपासली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

Saam Tv

राज्यात आता पोलिसांची वाहने देखील तपासली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आचारसंहिता लागण्याच्या आदल्या रात्रीपर्यंत भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपापल्या उमेदवारांकडे पंधरा ते वीस कोटी रुपये फोहचवले आहेत. आणि हे सर्व पोलिस बंदोबस्तात झाले आहे. राज्यात हेलिकॉप्टरने पैसे जातात. त्यांना कोण अडवणार? असा सवाल उपस्थित केला आहे. जे काही दोन पाच कोटी रुपये पकडले जात आहेत, ते किरकोळ असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर त्यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी आम्ही निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आधीपासून केली आहे. मात्र, तरी देखील निर्णय घेतला जात नाही. रश्मी शुक्ला या आमच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: २१ मतदारसंघ आणि १५ दिवस, भरारी पथकाची बेधडक कारवाई; दारूसाठा, चांदीसह १४ कोटी ५७ लाखांचं घबाड जप्त

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली; घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात, एसआयडीचा गोपनीय रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Pandharpur News : पंढरपुरात शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार असेल तरच प्रचार; काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे वक्तव्य

Maharashtra News Live Updates : पुण्यात आचारसंहिता भंगाच्या ४९८ तक्रारी

Chanakya Niti : करिअरमध्ये होईल झपाट्याने प्रगती, लक्षात ठेवा आचार्य चाणाक्य यांचा गुरुमंत्र

SCROLL FOR NEXT