अमित शाह यांच्या आढावा बैठका, महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभा निवडणुकीत दिलेला कौल, नरेंद्र मोदींचे महाराष्ट्र दौरे, एकनाथ शिंदे यांचं सरकार या बाबींवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभेला हिशोब पूर्ण केला, असं राऊत यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हंटल आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यावर टीका केली आहे. अमित शाह उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शहा आढावा घ्यायला मणिपूरला गेले नाहीत, काश्मीरच्या सीमेवर गेले नाहीत, लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलंय त्याचा आढावाही त्यांनी घेतला नाही. अरुणाचल प्रदेशात चीनचं सैन्य 60 किमी आत घुसलंय त्याचा आढावा नाही. पण, उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री गृहखात्याचं विशेष विमान घेऊन येतात ही गोष्ट गमतीची वाटते. याचा अर्थ महाराष्ट्रात भाजपची खटीया खडी होतेय, त्यामुळं केंद्रीय गृहमंत्र्यांना यावं लागतंय, असं संजय राऊत यांनी म्हंटल आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.