municipal elections saam tv
Video

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Municipal Election : महापालिका निवडणुकांच्या मतदानाला काही तास शिल्लक असतानाच, निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना उघडकीस येत आहेत. मतदानाआधी उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक ठिकाणचे व्हिडिओ समोर आले आहेत.

Nandkumar Joshi

राज्यात महापालिका निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून किंबहुना त्याआधीपासूनच सुरू असलेला जाहीर प्रचार आता संपला आहे. १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. जाहीर प्रचार संपला तरी, छुपा प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. पण काही ठिकाणी मतदारांना पैशांचं प्रलोभन दाखवलं जात असल्याचं उघडकीस आलं आहे. राज्यातील अनेक भागांत उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटप केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.

मुंबई आणि आसपासच्या महापालिका परिसरांत ठिकठिकाणी पैसे वाटप होत असल्याचे आरोप होत आहेत. नेमकं काय घडत आहे, कोण आरोप करतंय आणि या घटनांचा निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे, याबाबतचा आढावा घेण्यात येत आहे. मुंबईला लागूनच असलेल्या वसईमध्ये भाजपच्या एका उमेदवाराकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे पनवेलच्या प्रभाग क्रमांक १७ मध्येही पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे. चेंबूर, चारकोपमध्येही असाच प्रकार घडला आहे. या घटनांमुळं निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पाडणार असल्याचा दावा फोल ठरला का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT