VIDEO:'मोदींची ईस्ट इंडिया कंपनी', Sanjay Raut यांचं खोचक विधान  Saam TV
Video

VIDEO:'मोदींची ईस्ट इंडिया कंपनी', Sanjay Raut यांचं खोचक विधान

Sanjay Raut News : आजपासून संसद अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यादरम्यान नवनिर्वाचीत खासदारांच्या शपथविधी पार पडणार आहे. यावरुन संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.खासदारांच्या शपथविधीवरुन संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. 3 दिवस नवीन खासदारांचा शपथ विधी होईल. इंडिया आघाडीचे खासदार मूळ गांधी पुतळ्याजवळ जमतील. एकत्रित प्रवेश करतील, प्रत्येकाच्या हाती संविधान प्रति असेल. मोदी शहांच्या ईस्ट इंडिया कंपनीला आता विरोधी पक्ष काय असतो ते कळेल. विरोधी पक्षनेता पहिल्या बाकावर असेल, 240 चे 275 कधी होतील हे त्यांना कळणार सुद्धा नाही. त्यांच्या सारखी आमची ईस्ट इंडिया कंपनी नागी असे म्हणत राऊतांनी मोदी आणि शहांवर निशाणा साधला आहे. यादरम्यान शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या शपथविधी विषयी सु्द्धा संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे. या देशात कायदा असेल तर वायकर यांना शपथ दिली जाणार नाही,प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, कायद्याचे पालन होत का हे पाहणं महत्तवाचं आहे असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

SCROLL FOR NEXT