Amit Thackeray addressing students in Pune, urges youth to protect girls and take strict action against offenders saam tv
Video

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

Amit Thackeray: पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या एका विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमादरम्यान, मनसे विद्यार्थी संघटनेचे नेते अमित ठाकरे यांनी एक भडकाऊ भाषण केले आहे. यात त्यांनी मुलींवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले.

Bharat Jadhav

  • अमित ठाकरे पुण्यात विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात सहभागी झाले.

  • भाषणात त्यांनी मुलींच्या सुरक्षेबाबत कठोर भूमिका मांडली.

  • मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

  • या विधानामुळे त्यांच्यावर समर्थन आणि टीका अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटत आहेत.

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसांना द्या असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी केला. पुण्यातील कोंढवा भागात आज विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी अमित ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी भाषणात अमित ठाकरे यांनी मुलींवर हात उचलणाऱ्यांना जबर शिक्षा करा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिलाय.

"जे लोकं मुलींवर हात उचलतील त्यांचे हातपाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजेत. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहतो. हे राज्य असं नाही की कोणीही मुलींवर हात टाकू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत महाविद्यालयात पाठवत असाल पण एक लक्षात ठेवा आपली जरी सत्ता नसेल तरी राज साहेब सत्तेत आहेत. मी पालकांशी बोलायला आलो आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी घाबरू नका आम्ही आहोत.", असं अमित ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

SCROLL FOR NEXT