Dissident MNS leaders arrive at Shivtirtha residence to meet party chief Raj Thackeray amid seat-sharing concerns. Saam Tv
Video

Mumbai Politics: जागा वाटपावरून मनसेत नाराजी, वरिष्ठ नेते राज ठाकरेंच्या भेटीला|VIDEO

Raj Thackeray Talks With Unhappy Party: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेतील नाराज पदाधिकारी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. जागावाटपावरून निर्माण झालेल्या अस्वस्थतेवर तोडगा निघतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Omkar Sonawane

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील नाराज पदाधिकारी आज शिवतीर्थ निवासस्थानी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासोबत होणाऱ्या जागावाटपात मनसेला अपेक्षित जागा मिळाव्यात, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या भेटीसाठी मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यासह मुंबई उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, मुंबई पूर्व उपनगर उपाध्यक्ष योगेश सावंत तसेच माजी नगरसेवक अनिशा माजगावकर हे शिवतीर्थावर उपस्थित झाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांमध्ये जागावाटपावरून अस्वस्थता असून, ती थेट राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या भेटीद्वारे केला जात आहे.

दरम्यान, या भेटीनंतर राज ठाकरे नेमका काय निर्णय घेतात, तसेच मनसेच्या नाराजीवर तोडगा निघतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्या महापालिकेत महापौर कोण? 29 महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर

पोलीस बंदोबस्तात पैसे वाटू, भाजप आमदाराचे कॉल रेकाँडिंग?

Maharashtra Farmer Loan Waiver: मोठी बातमी! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी; कृषिमंत्र्यांची घोषणा

अकोल्यात राजकारण तापलं! भाजपविरोधात विरोधक एकत्र; ठाकरे गटाला 'महापौरपद', 'वंचित'ला काय?

India Pakistan Height: भारतीय मुली पाकिस्तानच्या पोरींपेक्षा उंच कशा? काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT