MNS News SaamTv
Video

MNS News : मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप | Marathi News

Rajesh Yerunkar Alleging EVM Scam : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून आता ईव्हीएम घोटाळा झाल्याचे आरोप काही उमेदवारांकडून केले जात आहे. मनसेच्या दहिसरच्या उमेदवाराने देखील याबाबत सवाल उपस्थित केले आहे.

Saam Tv

घरात चार मतं आहेत, तरी मला दोनच मतं कशी मिळाली? असा सवाल मनसे उमेदवाराने ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपावरती उपस्थित केला आहे. मनसेचे दहिसरचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा हा आरोप केला आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानंतर महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे. तर महाविकास आघाडी तसंच मनसेचा दारुण पराभव झाला आहे. विधानसभेत यावेळी मनसेला आपलं खातंही उघडता आलेलं नाही. त्यानंतर आता विरोधकांकडून ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. त्याच अनुषंगाने मनसेचे दहिसरचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी देखील आता ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला आहे. माझ्या घरात मी, माझी पत्नी, मुलगी आणि आई अशी चार मतं आहेत. तरीही मला दोनच मतं कशी मिळाली असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर फॉर्म नंबर 17सी आणि ईव्हीएम मशीनचा नंबर देखील जुळत नसल्याचं येरुणकर यांनी म्हंटलं आहे. दोन-दोन दिवस झाल्यानंतर ईव्हीएम मशिनच चार्जिंग 99 टक्के कसं राहातं, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट ? हत्येसाठी धनंजय मुंडेंनी दिली सुपारी

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; धडकेनंतर कारनं घेतला पेट, व्हिडिओ व्हायरल

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

SCROLL FOR NEXT