Two waiters clash inside MLA residence canteen in Maharashtra; raises fresh concerns a day after Sanjay Gaikwad assault incident. saam tv
Video

आमदार निवासाच्या कॅन्टिनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा; आज दोन वेटरमध्ये तुंबळ हाणामारी| VIDEO

Sanjay Gaikwad Canteen Assault Controversy: आमदार निवासातील कॅन्टिनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ निर्माण झाला आहे. आज दोन वेटरांमध्ये झालेल्या मारामारीमुळे वातावरण तणावपूर्ण झालं आहे.

Omkar Sonawane

आमदार निवासाच्या कॅन्टिनमध्ये पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आज दुपारी दोन वेटर आपापसात भिडल्याने कॅन्टिनमध्ये गोंधळ उडाला. वादाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, उपस्थितांनी दोघांनाही वेळीच वेगळं केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ही घटना कालच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी घडल्याने चर्चेला उधाण आलं आहे. काल आमदार संजय गायकवाड यांनी शिळे अन्न दिल्याच्या कारणावरून कॅन्टिनमधील एका कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण विधानसभेपर्यंत पोहोचले.

आज झालेल्या नव्या वादामुळे कॅन्टिनमधील प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. सतत घडणाऱ्या या घटना लक्षात घेता, प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaug Visarjan 2025 : लालबाग राजाच्या विसर्जनाला विघ्न, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

Heart-Touching Video : बाप्पाला घरी घेऊन चला, पाण्यात सोडू नका, शिवण्याचा बाबाकडे हट्ट, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Maharashtra Live News Update: पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल

Lalit Prabhakar : 'आरपार'नंतर ललित प्रभाकर हिंदी चित्रपटात झळकणार, सिनेमाचे नाव काय?

Amravati : बाप्पाला निरोप देताना घडले अघटित; अमरावती जिल्ह्यात तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT