Uddhav Thackeray with INDIA Bloc VP candidate Sudarshan Reddy at Matoshree Saam Tv
Video

Uddhav Thackeray: संख्याबळ नाही तरी चमत्कार घडेल; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान|VIDEO

Sudarshan Reddy Meeting Uddhav Thackeray At Matoshree: उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत संख्याबळ नसतानाही चमत्कार घडू शकतो असे विधान केले. इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला.

Omkar Sonawane

इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

उपराष्ट्रपती निवडणुकीत संख्याबळ नसतानाही चमत्कार घडेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

एनडीएकडून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गोपनीय मतदानामुळे चमत्काराची शक्यता असल्याचे उद्धव ठाकरेंचे सूचक विधान चर्चेत आले आहे.

देशाच्या उपराष्ट्रपतीची निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि एनडीएकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे. सत्ताधारी भाजपकडून राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली असून तर इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या आखाड्यात आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज मातोश्री येथे जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि बी. सुदर्शन रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, देश एका विचित्र परिस्थितीमधून जात आहे. देशासाठी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक महत्वाची आहे. याआधीच्या उपराष्ट्रपतींना अचानक राजीनामा दिला. त्याचे कारण प्रकृतीचे असल्याचे सांगण्यात आले. पण अजूनही त्याचे खरे कारण समोर आले नाहीये. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एक सूचक विधान केले आहे आवश्यक संख्याबळ नसल तरी देश वाचवण्यासाठी आम्ही लढतोय. संख्याबळावर निवडणूक अवलंबून असती तर निवणूक घेण्याची गरज नसती. या निवडणुकीत गोपनीयता आहे. मात्र, चमत्कार घडवण्याची ताकद असलेले आणि ज्यांच्या मनात छुप्या पद्धतीने देशप्रेम आहे ते इंडिया आघाडीला मदत करतील असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच चमत्काराला व्याख्या आणि आकार नसतो असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचवल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : कोल्हापुरात शेतकरी आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊसाच्या कांड्या फेकल्या

Diabetes symptoms: डायबेटीसच्या रुग्णांना इशारा, शरीरात ५ बदल दिसले तर सावध व्हा; होऊ शकते किडनी फेल

Fried Rice Recipe: बिर्याणी विसराल! काही मिनिटांत तयार करा परफेक्ट झणझणीत व्हेज फ्राईड राईस, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी निलंबित

Kidney Detox Drinks: वेट लॉस ते किडनी Detox; 'या' भाज्याचं ज्यूस प्या, तब्येत राहिल फिट, आजार छुमंतर

SCROLL FOR NEXT