Dhananjay Munde Saam tv
Video

Dhananjay Munde : संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, धनंजय मुंडे यांचं मोठं विधान | Video

Santosh Deshmukh Death Case News : बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया आज मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्राकरांशी बोलत होते.

Saam Tv

माजी सरपंच संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या केली आहे, त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी. एवढाच आमचा सध्या उद्देश्य आहे, असं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. आज कॅबिनेटच्या बैठकीनंतर त्यांनी मंत्रालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड यांच्यावर भाष्य केलं.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, या प्रकरणी मी राजीनामा देण्याची मागणी होत आहे. पण माझा या प्रकरणात कोणताही संबंध नाही, त्यामुळे मी का राजीनामा देऊ. या प्रकरणावर चौकशीसाठी आम्ही एसआयटी स्थापन केली आहे. सीआयडीकडून देखील तपास योग्य प्रकारे सुरू आहे. दिवंगत संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन त्यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी एवढंच सध्या आमच्यासाठी महत्वाचं आहे, असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

टिटवाळ्यात पाणीटंचाईचा कहर! पाणी आणायला गेलेल्या 3 चिमुकल्यांना भरधाव कारची धडक

SCROLL FOR NEXT