पतसंस्थेत ठेवीदारांचे पैसे अडकवल्यामुळे आणि मंत्र्यांनी पैसे परत करण्याचे खोटे आश्वासन दिल्यामुळे MIM नेते इम्तियाज जलील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी नगर येथे येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याला विमानतळावर अडवण्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे. कोट्यवधी रुपये ठेवीदारांचे घोटाळ्यात अडकले मात्र खोट्या आश्वासनामुळे विमानतळावर मंत्र्यांना अडवण्याचा इशाराच जलील यांनी दिला आहे. पतसंस्थांमधील घोटाळे वाढल्यानंतर छत्रपती संभाजी नगरमधील खातेदार आणि ठेवीदार अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. खातेदारांसोबत मंत्र्यांना अडवून जनतेचे पैसे कधी देणार हा प्रश्न विचारणार असल्याचं खासदार इम्तियाज जरील यांनी सांगितलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.