Midnight Firing Incident in Punes Saam Tv
Video

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार, धाडधाड करत ३ गोळ्या झाडल्या; नागरिक घाबरले

Midnight Firing Incident in Punes: पुण्याच्या गुलटेकडी परिसरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली. दहशत निर्माण करण्यासाठी सराईत आरोपीने तीन राऊड फायर केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Priya More

पुण्यामध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली. पुण्यातील गुलटेकडी परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. अल्पवयीन सराईत आरोपीने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीने दोन ते तीन राऊंड फायर केले. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्याने हवेत गोळीबार केला. दोन गटातील वादातून हा गोळीबार झाला आहे. गोळीबारामध्ये कुणीही जखमी नाही, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली. मध्यरात्री घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे गुलटेकडी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vadapav Recipe: घरी वडापाव बनवताना ‘या’ 5 टिप्स लक्षात ठेवा; दुकानात मिळतो तसा टेस्टी लागेल!

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक

E Challan : आता रस्त्यांवर लोकल पोलिसही कापणार ई-चलान; ट्रॅफिक नियम मोडणाऱ्यांवर वाढणार कारवाई

माजी मुख्यमंत्र्यांच्या भाचीचा खोलीत आढळला मृतदेह; मोठी खळबळ

मुलांच्या जीन्सप्रमाणे मुलींच्या जीन्सला पुढे चैन का असते? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT