Rain Alert SaamTv
Video

Rain Alert : राज्यातील या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी|Marathi News

Meteorological Department News : उत्तर भारताकडून थंड वारे अन् दक्षिणेतून येणारे बाष्पयुक्त वारे यांची टक्कर राज्यावर होत असल्याने २६ ते २८ डिसेंबरमध्ये राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Saam Tv

राज्यात २६ डिसेंबरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात हा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्र २६ ते २८ डिसेंबरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर भारताकडून थंड वारे अन् दक्षिणेतून येणारे बाष्पयुक्त वारे यांची टक्कर राज्यावर होत आहे. त्यामुळे वरच्या थरांत झोतवारा (जेट स्ट्रीम विंड) वेगाने वाहत आहे. हे वारे वातावरणाच्या खालच्या थरांतही येत असल्याने राज्यात बोचरे वारे, दाट धुके अन् पावसाचे वातावरण तयार झाले असून बुधवारपासून चार दिवस काही भागांत पावसाच्या सरींचा अंदाज आहे. महाराष्ट्रात मात्र उत्तर व दक्षिण भागातून येणार्‍या वार्‍यांची टक्कर होत असल्याने विचित्र वातावरण तयार झाले आहे. तापमानात वाढ होऊनही वरच्या थरातील वारे, दाट धुके अन् पाऊस असे वातावरण 25 ते 29 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सध्या धुळे, नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यात इतर भागातही पाऊस वाढण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav-Raj Thackeray: शिवसेना- मनसे एकत्र येणार? महापालिकेसाठी ठाकरे सेनेचा मविआला रामराम? वाचा स्पेशल रिपोर्ट

Shani Budh Yuti: दिवाळीनंतर बनणार नवपंचम राजयोग; वर्षाच्या अखेरीस 3 राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Heavy Rain Hingoli: पावसाचा हाहाकार! पुरात अडकलेल्या शिंदे गावातील नागरिकांचे धोकादायक स्थितीत रेस्क्यू ,थरारक Video Viral

Laxman Hake News : 'धोबी, नाभिक समाजाला SC आरक्षण द्या'; हाकेंची मागणी, कोणत्या राज्यात धोबी समाज कोणत्या यादीत?

Shani Shingnapur: राज्य सरकारचा शनैश्वर देवस्थानबाबत सर्वात मोठा निर्णय , देवस्थान ट्रस्ट बरखास्त

SCROLL FOR NEXT