Mumbai BMC Election Result Eknath Shinde saam tv
Video

एकनाथ शिंदेंचे नगरसेवक फुटणार? महापालिका निवडणूक निकालानंतर मुंबईत 'राजकीय हायअलर्ट'!

Mumbai Mayor Politics : मुंबई महापालिकांचे निकाल जाहीर झाले असून, भाजप-शिंदेसेनेच्या युतीची सत्ता आली आहे. मात्र, महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून, मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. खबरदारी म्हणून शिंदेंनी २९ नगरसेवकांना वांद्र्यातील हॉटेलमध्ये ठेवलं आहे.

Saam Tv

मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागताच राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये शिफ्ट केलं आहे. नगरसेवक फुटण्याच्या भीतीने ही खबरदारी घेतल्याचे सांगितले जात आहे.

आकड्यांचा खेळ हा नगरसेवक फुटीच्या भीतीमागचं कारण आहे. २२७ सदस्यांच्या मुंबई महापालिकेत मॅजिक फिगर ११४ आहे. भाजपने ८९ जागा जिंकल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला २९ जागांवर विजय मिळाला आहे. या युतीचा आकडा ११८ पर्यंत पोहोचला असून, बहुमतापेक्षा चार जागा अधिक आहेत. मात्र, नगरसेवक फुटण्याची भीती शिंदेंना सतावत असल्याचे बोलले जाते. खबरदारी म्हणून शिंदेंनी आपल्या २९ नगरसेवकांना वांद्र्यातील 'ताज लँड्स एंड' हॉटेलमध्ये ठेवलं आहे. नगरसेवक फुटू नयेत किंवा घोडेबाजार होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. पुढील तीन दिवस हे सर्व नगरसेवक याच हॉटेलमध्ये मुक्कामाला असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या नगरसेवकांशी संवाद साधून पुढील रणनीती ठरवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs RCB IPL 2026:मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक, मुंबईला घरच्या मैदानात RCBनं हरवलं!

करमाळ्यात मेंढपाळसहीत महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Acid Attack: पुन्हा अ‍ॅसिड हल्ला! दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी तरुणीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड सदृश रसायन

Ranjangaon: भीमाशंकरनंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर बंद? काय आहे कारण?

बिबट्याला पकडताना आमदार चंद्रकांत पाटलांची स्टंटबाजी|VIDEO

SCROLL FOR NEXT