Matheran Saam TV
Video

Matheran News : महत्त्वाची बातमी! कडाक्याच्या उन्हात माथेरान बंद, नेमकं कारण काय?

आजपासून पर्यटकांसाठी माथेरान बंद असेल. पर्यटन बचाव संघर्ष समितीने सोमवारी याबाबतचा निर्णय घेतला. याला स्थानिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पर्यटकांची फसवणूक होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

Matheran Tourism Close : आजपासून ( १८ मार्च) माथेरानमध्ये बेमुदत बंद जाहीर करण्यात आला आहे. येथील पर्यटन बचाव संघर्ष समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. माथेरानमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीच्या तसेच लुटीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे माथेरानची बदनामी होत आहे. या बदनामीचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. ही फसवणुकीची पद्धत करण्यात यावी, त्यासाठी माथेरान बंदची हाक देण्यात आली आहे. सोमवारी माथेरान बंदची हाक देण्यात आला होती, त्याला स्थानिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलेल्या मागण्यांची पूर्तता स्थानिक प्रशासन करू शकत नाही, त्यामुळे समितीने आजपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. या बंदला हॉटेल इंडस्ट्री, ई रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था यांनी समर्थन दिले आहे. जोपर्यंत स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेय. दरम्यान, या बंदमध्ये शालेय विद्यार्थ्यांना ई रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु कोणाही प्रवाशांना ही सेवा उपलब्ध नसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या स्थायी आणि बेस्ट समितीच्या निवडणुकीत ठाकरे गटाची माघार

Narhari Zirwal: नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन समोर, लाच घेतानाच्या VIDEO ने उडवली खळबळ

राज्यसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, नातू-आजोबा सोबत राज्यसभेवर जाणार?

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी 14 बैठका, बड्या नेत्याचा मोठा दावा

T20 World Cup : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? असं असू शकतं टी २० वर्ल्डकपचं समीकरण

SCROLL FOR NEXT