Mumbai-Goa Highway Traffic saam tv
Video

Mumbai-Goa Highway Traffic : मुंबई-गोवा हायवेवर ट्रॅफिक जॅम, वाहनांच्या ६-७ किलोमीटर रांगा

Massive Traffic Jam on Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. होळीसाठी निघालेल्या चाकरमान्यांची वाहने या कोंडीत अडकून पडली आहेत. जवळपास सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Nandkumar Joshi

सचिन कदम | रायगड

शिमगोत्सवासाठी गावची अर्थात कोकणची वाट धरणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूरजवळ अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे. याचा फटका मुंबई आणि परिसरातून कोकणात निघालेल्या शेकडो कुटुंबीयांना बसला आहे. दुसरीकडे, कोकणातून मुंबई आणि उपनगरांच्या दिशेने येणारी वाहनेही दुसऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडीत अडकली आहेत.

शिमगोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकले आहेत. माणगाव आणि इंदापूरजवळ वाहने अडकली आहेत. वाहनांची जवळपास सहा ते सात किलोमीटरपर्यंत रांग लागली आहे. कासवगतीने ही वाहने पुढे सरकत आहेत. भरउन्हात वाहतूक कोंडीतून वाट काढताना कारचालकांना कसरत करावी लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे अनेक ठिकाणी काम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने माणगाव-इंदापूरमध्ये रस्ता अरुंद असल्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Jio Recharge Plan: कमी खर्चात जास्त सुविधा! जिओचा 70 दिवसांचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन, वाचा फायदे

Bhoplyachi Bhaji Recipe : गरमागरम वडे अन् भोपळ्याच्या भाजी, संडे स्पेशल चटपटीत बेत

Rashmika Mandanna Engagement : नॅशनल क्रश रश्मिकानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी पावसाचे आगमन, पालघरसह नाशिकला ऑरेंज अलर्ट, कुठे कसा असणार पाऊस, वाचा

SCROLL FOR NEXT