Goregaon Film City Fire Saam TV
Video

Goregaon Film City Fire : गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग! अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक | VIDEO

Film City Fire News: अनुपमा मालिकेच्या सेटला आग लागली असून, सुदैवानं जीवितहानी टळली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. 'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेच्या सेटला ही आग लागली असून, संपूर्ण सेट जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. सध्या कुलिंगचे काम सुरू असून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

सुदैवानं या आगीत कुणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही.आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत. या आगीमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे मालिकेच्या चित्रीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात गेल्या अकरा दिवस सुरू असलेली एमपीएससी आंदोलन स्थगित

Tea Leaves : फक्त १ चमचा चहापत्ती आणि केस होतील मजबूत, आठवडाभरात दिसेल चमत्कारिक फरक

ज्ञानेश कुमारांविरोधात दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत आंदोलनाचा धडाका,कधी-कधी झाले आंदोलनं?

दिल्लीत रक्षकांकडूनच 'दुर्गे'चा छळ; महिला आंदोलकांसोबत पोलिसांची गुंडगिरी

CJP आंदोलन करणार की थांबवणार, कोर्टाच्या बंधनानंतर दीपके काय करणार?

SCROLL FOR NEXT