Kalyan Saam TV
Video

Kalyan : कल्याणमधील वसंत व्हॅली परिसरातील गोदामाला भीषण आग | VIDEO

Vasant Valley Fire : कल्याण पश्चिममधील वसंत व्हॅलीतील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील केमिकल्सचा साठा असल्यानं काही क्षणांतच आगीनं रौद्र रूप धारण केलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात मध्य रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. डी मार्टच्या शेजारी सुरू असलेल्या एका नव्या इमारतीच्या गोडाऊनमध्ये ही आग लागली. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकलचे ड्रम साठवण्यात आले होते. त्यामुळे आग लागताच मोठा स्फोट झाला आणि आगीने रौद्र रूप धारण केले.

आगीच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सुमारे एक तास युद्धपातळीवर काम करत या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्रीची वेळ असल्यामुळे गोडाऊनमधील कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT