vidhansabha news  saam tv
Video

VidhanBhavan Fire: मोठी बातमी! विधानभवन परिसरात भीषण आग, घटनास्थळी परिस्थिती काय? VIDEO

Mumbai News: मुंबई येथील विधानसभा परिसरात भीषण आग लागली आहे, मिळालेल्या माहितीनुसार विधानभवनमध्ये आमदार, खासदार देखील उपस्थित होते.

Omkar Sonawane

आज विधान भवन परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग गेटजवळील भागात लागली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिसरात दाट धुराचे लोट पसरले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

या वेळी विधान भवन परिसरात आमदार आणि खासदार उपस्थित होते. एका कार्यक्रमानंतर ते भोजनासाठी निघाले असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप प्राप्त झालेले नाही.

संपूर्ण परिसर सुरक्षिततेच्या दृष्टीने रिकामा करण्यात आला आहे. आग नेमकी कशी लागली याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghabadkund Movie: पुण्यात १२ हजार स्क्वेअर फुट जागेवर भव्यदिव्य सेट; 'घबाडकुंड'चा थरार

Janmashtami 2025 : लाडक्या कान्हाला '५६ भोग' असा नैवेद्यच का अर्पण केला जातो?

Child Birth Rate : लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाचा मोठा निर्णय; मुलाच्या जन्मासाठी मिळणार तब्बल ६ लाख रुपये

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Latur Tourism : विकेंड गेटवे! लातूरमधील किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं तुमची वाट पाहतायेत, लगेचच द्या भेट

SCROLL FOR NEXT