A massive fireball rises after a diesel tanker explodes at Manjarsumba Ghat on the Dhule–Solapur Highway in Beed. Saam Tv
Video

डिझेल टँकर पेटला; आगीच्या ज्वाळा अन् धुराचे काळेकुट्ट लोट रस्त्यावर पसरत गेले...VIDEO

Massive Diesel Tanker Explosion In Beed: बीडच्या मांजरसुंबा घाटात डिझेल टँकर उलटून झालेल्या भीषण स्फोटामुळे धुळे–सोलापूर महामार्गावर प्रचंड आग लागली. परिसरात घबराटीचे वातावरण असून पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Omkar Sonawane

बीडच्या मांजरसुंबा घाटात आज काही वेळापूर्वी डिझेलच्या टँकरला भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात आगीचे प्रचंड लोट उठताना दिसत असून धुळे–सोलापूर महामार्गावर घबराटीचे वातावरण पसरले आहे. घटना पालीलगत असलेल्या मांजरसुंबा घाटातील कोळवाडी फाटा परिसरात घडली. टँकर उलटून त्याला आग लागली आणि काही क्षणांतच स्फोट झाला. या आगीचा फटका घाटातील गायरान जमिनीला देखील बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. तसेच टँकरचा चालक आणि क्लिनर कुठे आहेत, याबद्दलची माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; 4 तहसीलदारांसह दहा जण निलंबित, प्रशासनात खळबळ

मध्य रेल्वेचा जुना ब्रिज पाडताना घडली दुर्घटना; कामगाराचा मृत्यू

बीडमध्ये भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक; भयावह दुर्घटनेचा घटनाक्रम आला समोर

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

SCROLL FOR NEXT