Mumbai News  Saam Tv
Video

Kokan Railway : लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी प्रवाशांची झुंबड; रेल्वेत कोकणवासीयांचे हाल

Mumbai News : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यामध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. प्रवाशांना मिळेल त्या जागी बसून किंवा उभे राहून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

Alisha Khedekar

गणेशोत्सव म्हटल की कोकणवासीयांचा उत्साह डोळ्यांसमोर उभा राहतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणातील गावे गजबजून जाणार आहेत. मात्र या आनंदाच्या प्रवासात कोकणवासीयांना मोठ्या प्रमाणावर हाल सोसावे लागत असल्याचे चित्र यंदाही पाहायला मिळत आहे. रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असून प्रवासी मिळेल त्या जागेवर बसून, उभे राहून अथवा गाड्यांच्या दारात उभे राहून प्रवास करताना दिसत आहेत.

गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत असल्याने शनिवारी रात्रीपासूनच कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. आज देखील पहाटेपासूनच कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर हजेरी लावली होती. मुंबईतील दिवा, ठाणे, पनवेल, स्थानकांवर कोकणवासीयांची प्रचंड गर्दी झाली. आज सकाळी सुटणाऱ्या चिपळूणकडे जाणाऱ्या मेमो गाडीकरिता गर्दी झाली. ही गर्दी इतकी होती की गाडी थांबताच शेकडो प्रवासी गाडीत चढण्यासाठी धावले.

दरम्यान, गाड्या उशिरा धावल्यामुळे प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. वेळेवर गाड्या सुटत नसल्याने स्थानकांवर तासन्‌तास उभे राहावे लागत असून यामुळे महिला व लहान मुलांचे हाल अधिकच होत आहेत. तरीदेखील लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्याची आणि कोकणात आपल्या घराघरांत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात सहभागी होण्याची आस इतकी प्रबळ आहे की, या सर्व अडचणींवर मात करून प्रवासी प्रवास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आपण सोबत निवडणूक लढलो...पक्षप्रवेशावरील नाराजीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, VIDEO

Maharashtra Live News Update: महाबळेश्वरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन

Maharashtra Politics : घराणेशाहीचा रेकॉर्ड मोडला; भाजप अन् शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी

Winter Health: हिवाळ्यात दिवसभर किती लिटर पाणी प्यावे?

ऐन निवडणुकीत IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

SCROLL FOR NEXT