hingoli turmeric market closed due to diesel shortage. AI saam tv
Video

Halad Market : मराठवाड्यातील सर्वात मोठं हळद मार्केट बंद, डिझेल टंचाईमुळं शेतकऱ्यांपुढं संकट, VIDEO

hingoli turmeric market closed due to diesel shortage : हिंगोली जिल्ह्यात डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे पुढील 5 दिवस हळद मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. डिझेल मिळत नसल्यानं वाहतूक करणे अशक्य असल्याचं सांगत व्यापाऱ्यांनी हळद खरेदीला स्पष्ट नकार दिलाय.

Nandkumar Joshi

संदीप नागरे, हिंगोली | साम टीव्ही

डिझेल टंचाईचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळं मराठवाड्यातील सर्वात मोठं हळद मार्केट बंद झालंय. हिंगोलीच्या संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हळद मार्केट डिझेलअभावी बंद करण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची हळद खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने पुढील ५ दिवस हळद खरेदी-विक्री बंद राहणार आहे.

शेतकऱ्यांचा खरेदी केलेला माल बाहेरच्या जिल्ह्यात पाठवण्यासाठी इंधन मिळत नसल्याने व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं बाजार समिती प्रशासनाने सांगितले आहे. शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात इंधन टंचाईची झळ बसत असल्याने गावातून मार्केटमध्ये हळद आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. पुढील पाच दिवस हे मार्केट बंद राहणार असल्याने खरिपाच्या तोंडावर हळद उत्पादक शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी-बियाणे आणि खतांची खरेदी करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT