Manoj Jarange Patil speaks aggressively during a public interaction with BJP MLA Prasad Lad over the Maratha reservation issue. saam tv
Video

६० टक्के ओबीसी, ३४ टक्के मराठा; थेट आकडेवारी सांगत मनोज जरांगे भाजप आमदारासामोर भडकले|VIDEO

Manoj Jarange Maratha Reservation Protest Maharashtra: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले असून भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासमोर त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या निकषांवर थेट प्रश्न उपस्थित केले.

Omkar Sonawane

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 तारखेपासून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारकडून त्यांचे मनधरणीचे करण्याचे प्रयत्न पाहायला मिळत आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि थेट माध्यमांसमोर चर्चा केली. यावेळी जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. जरांगे पाटील आमदार लाड यांना बोलताना म्हटले की, आम्ही ओबीसींचे आरक्षण मागत नाहीत, तर आम्ही आमच्या हक्काचे मागत आहोत.

आमचे लेकरं आज दुसऱ्यांच्या शेतात काम करतात, ऊसतोडी करतात, स्वतःचं वावर असूनही त्यांच्या नोंदी नाहीत, त्यांना आरक्षण दिलं जातं. ओबीसींचे नाही तर आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. तुम्हाला काय वाटतं तेच आम्हाला कळत नाही, ओबीसी आरक्षणाला नेमका निकष काय लावला? आम्हाला तीन वेळा मागास सिद्ध केलं तरीही आरक्षण मिळत नाही, 1994 ला ओबीसींना कशाच्या आधारे आरक्षण दिलं? आमचं गॅझेट आहे तर आम्हाला आरक्षण द्या. मराठा समाजाला सरसगट प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत? 4 वर्षात ओबीसींची संख्या 30 टक्के वाढली कशी असा मोठा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोन्याच्या भावात अचानक मोठी उलथापालथ! आठवड्यात सोनं तब्बल ₹३,४४० ने स्वस्त; पाहा १८, २२ अन् २४ कॅरेटचे नवे दर?

Maharashtra News Live Update: कृष्णराज महाडिक नेमके काँग्रेसचे की भाजपचे?

Supreme Court : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह ८ राज्यातील उच्च न्यायालयांना नवे मुख्य न्यायाधीश; पाहा कोणाची कुठे नियुक्ती

Best Teas For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 5 चहा ठरतील फायदेशीर; जाणून घ्या कोणते आहेत?

Ukadiche Modak Recipe : उकडीचे मोदक फाटतात? 'ही' ट्रिक वापरा, प्रत्येक मोदक बनेल परफेक्ट

SCROLL FOR NEXT