Manoj Jarange SaamTv
Video

Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटलांची माघार; म्हणाले.. | Video

Maharashtra Assembly Election News : विधानसभा निवडणुकीतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज माघार घेतली आहे. गुपचुप जायचं आणि मतदान करून माघारी यायचं, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी मराठा समाजाला केलं आहे.

Saam Tv

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या भूमिकेवरून युटर्न घेतला आहे. काल (रविवारी) त्यांनी दिवसभर उमेदवारांच्या बैठका घेतल्या. तर काही मतदारसंघ देखील जाहीर केले. मात्र आज सकाळी जरांगे यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यावर आनंदराज आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ''दलित आणि मुस्लिम समाजाकडून एकही उमेदवार पुढे आलेला नसला तरी जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. त्यांनी हा निर्णय आगामी काळातील आंदोलनाचा विचार करून घेतला आहे.'' त्यासाठी आमचा त्यांना पाठिंबा असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी म्हंटलं आहे.

विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटलांनी माघार घेतलीय. एका जातीवर निवडणूक लढवता येऊ शकत नाही असं जरांगे म्हणालेत. गुपचुप जायचं आणि मतदान करून माघारी यायचं असं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलंय. मराठ्यांच्या माणसांनी कोणाच्या हि प्रचाराला, कोणाच्या हि सभेला जाऊ नका असं देखील जरांगे यांनी म्हटलंय. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकर काढून घ्या, अर्ज कोणीही ठेवू नका असं देखील जरांगे म्हणालेत. कोणत्या ही अपक्षाला, राजकीय पक्षाला आम्ही पाठिंबा दिलेला नाही असं सांगत कोणत्याच जागेवर आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नसल्याचं जरांगे म्हणालेत. ज्याला पडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आण्याचं त्याला निवडून आणा असं जरांगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT