Manoj Jarange addressing media, launching a sharp attack on Chhagan Bhujbal over the Maratha-OBC reservation issue. Saam Tv
Video

Manoj Jarange: ४० चोर घेऊन येवल्याचा आली बाबा लय बोलतो, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर प्रहार|VIDEO

Manoj Jarange Statement On Maratha vs OBC Reservation clash: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना “येवल्याचा अलीबाबा” अशी उपमा दिली.

Omkar Sonawane

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. १० सप्टेंबरला नागपुरात होणाऱ्या ओबीसींच्या मोर्च्यावर बोलताना त्यांनी परळीतील तथाकथित “लाभार्थी टोळी”वर तीव्र निशाणा साधला.

जरांगे म्हणाले की, ओबीसींना आरक्षण मिळालं तेव्हा मराठा समाजाने विरोध केला नाही. पण आज मराठा समाजाला न्याय मिळणार तेव्हा विरोध सुरू आहे. महाराष्ट्र अस्थिर करायचा हा केवळ लाभार्थी टोळीचा डाव आहे. आम्ही लढून मिळवलं, त्यांना लढायलाही लागलं नाही. आमच्याच नेत्यांनी जीआर काढले तरी आम्ही विरोध केला नाही.

ते पुढे म्हणाले की, ओबीसींना नुकसान होत नाही. अनेक वर्षांपासून मात्र आमचं नुकसान झालं. १६ टक्के बोगस आरक्षण तुम्ही खात होतात. ५० टक्क्यांच्या वरचा भागही तुम्ही घेतला. ओपन कोट्यातसुद्धा तुम्ही जागा घेतलात. तरीही विरोध करता.

जरांगे यांनी छगन भुजबळ, यांच्यावर थेट हल्लाबोल करत “अलिबाबा आणि ४० चोर”, “परळीची लाभार्थी टोळी” अशा शब्दांत टीका केली. त्यांनी बंजारा समाज, धनगर समाजालाही वेगळा न्याय द्यावा अशी भूमिका घेत आम्ही जातीवादी नाही, पण परळी गट मराठे-धनगर-ओबीसी यांच्यात भांडण लावतोय असे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, ओबीसींना नुकसान होत नाही. अनेक वर्षांपासून मात्र आमचं नुकसान झालं. १६ टक्के बोगस आरक्षण तुम्ही खात होतात. ५० टक्क्यांच्या वरचा भागही तुम्ही घेतला. ओपन कोट्यातसुद्धा तुम्ही जागा घेतलात. तरीही विरोध करता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पोलिस भरती प्रक्रिया थांबवणार

Attractive Womens Qualities: आकर्षक दिसणाऱ्या महिलांमध्ये कोणते गुण असतात?

Gold Rate Today : आजही सोन्याचे दरात मोठी घसरण, प्रति तोळा 'इतक्या' रूपयांवर घसरलं, वाचा 24, 22 आणि 18k ताजे दर

Fertility Problems: करिअरच्या नादात मोठी चूक? नोकरी करणारे ६०% कपल्स प्रजननाच्या आरोग्य तपासणीकडे फिरवतात पाठ

EPFOमध्ये बँक अकाउंट अपडेट कसं करायचं? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT