manoj Jarange Patil questioning retired Justice Shinde during Maratha reservation agitation in Mumbai. Saam Tv
Video

Maratha Reservation: ओबीसीत ३५३ जातींचा समावेश कसा केला? मनोज जरांगेंचा न्यायमूर्तींना थेट सवाल|VIDEO

Maratha Community Demand For OBC: मनोज जरांगे पाटील यांनी न्यायमूर्ती शिंदे यांना थेट सवाल केला की ओबीसीत ३५३ जातींचा समावेश कसा झाला? मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर तातडीने कायदा करा आणि अंमलबजावणी करा, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

Omkar Sonawane

मनोज जरांगे यांचे उपोषण मुंबईत सुरु असून ते ठाम भूमिकेत आहेत.

न्यायमूर्ती शिंदेंना त्यांनी थेट सवाल केला की ओबीसीमध्ये ३५३ जातींचा समावेश कसा झाला?

मराठवाड्यातील मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र वाटप व्हावे, अशी मागणी.

कायदा करून अंमलबजावणी होईपर्यंत मागे हटणार नाही, असा जरांगेंचा इशारा.

मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी शुक्रवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. यानंतर सरकारने पाऊले उचलत त्यांच्यातर्फे निवृत्त न्यायाधीश शिंदे हे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते.

मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करायला आधार लागतो. मग आधारच पाहिजे तर 58 लाख नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे कुणबी आणि मराठा हे एकच असल्याचे दिसून आले आहे. आधार मिळालेला आहे. मग कायदा करा. तुम्ही आता कायदा करा आणि अमलबजावणी करा. त्याशिवाय मी हटवू शकत नाही, चार दोन दिवस तुम्हाला वेळ लागत असेल तर देऊ. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपात्राचे वाटप उद्यापासून झालेच पाहिजे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. मी मागे हटणारच नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बेपत्ता तरुणीचं गूढ उकललं; खंडाळा घाटात नेलं अन् बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं; रत्नागिरीत खळबळ

Ukadiche Modak Tricks: उकडीचे मोदकाच्या कळ्या नीट येत नाही? पीठ बनवताना वापरा 'हे' ट्रिक्स मोदक तुटणार नाही

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Shocking: १५० जणांना घेऊन जाणारी प्रवासी बोट समुद्रात बुडाली, ७० जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

मोठी बातमी! शरद पवार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यानं दिली माहिती

SCROLL FOR NEXT