maratha reservation agitation peaceful protest in mumbai Saam TV Marathi News
Video

MARATHA RESERVATION : "गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता माघार नाही", जरांगे पाटलांचा निर्धार

Maratha protest Mumbai: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार केला. आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही, शांततेत आंदोलन करा, समाजाचं नाव खाली जाऊ देऊ नका, असे जरांगे पाटील म्हणाले.

Namdeo Kumbhar

maratha reservation protest live updates मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय येथून कुणीही हलायचे नाही. शांततेत आंदोलन करायचे आहे. कोणीही जाळपोळ, दगडफेक करू नका. आंदोलनाला बट्टा लावायचा नाही, मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटणार नाही. एकवेळ मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातून केला.

सरकारनं आपल्याला सहकार्य केलेय. आता आपणही सरकारला सहकार्य करावं. समाजाचं नाव खाली जाईल, असं कुणीही वागू नये. दारु पिऊन धिंगाणा घालू नका, समाजाला खाली मान घालावी लागेल, असं कृत्य करू नका, असे आवाहन जरांगेनी मराठा समजाला केले. कोण काय सांगतंय, कोण राजकीय पोळी भाजतंय, त्यासाठी कोणी आपल्या आंदोलनाचा वापर करतंय का? हे गांभीर्याने पाहा. दोन तासांत मुंबई मोकळी करुन द्या, पोलिसांना सहकार्य करा, एकही पोलीस नाराज होणार नाही, याची काळजी घ्या, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT