Manoj Jarange SaamTv
Video

VIDEO : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मी कुणाला भित नाही...!, जरांगे पाटील उपोषणावर ठाम

Manoj Jarande Patil News : मराठा आरक्षणासाठी उपोषणावर ठाम असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. ते बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Saam Tv

राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या थोड्या दिवसाचा मंत्रिमंडळ स्थापन होईल अनेक मराठा आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांनी आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरावं विधानभवनात मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न मांडावेत मुख्यमंत्री कोणीही झाले तरी मला फरक पडणार नाही मी माझ्या समाजासाठी उपोषणावर ठाम असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये मिडीयाशी बोलतांना दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तरीही मला फरक पडणार नाही, कारण या अगोदरही ते सरकार मध्ये होते, त्यांनी काय केलं? कसं केलं आणि काय करायचं, कसं करायचं? हे आम्हाला चांगलं माहित आहे. त्यामुळे कुणीही मुख्यमंत्री झालं तरी आम्ही कुणाला भिणारे मराठे नाहीत आणि मराठा बांधवांनी दुसरीकडे कुठेही उपोषण न करता फक्त अंतरवली सराटीमध्येच उपोषण होणार असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय, मी काही दिवसात याची तारीख सांगणार आहे मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत थांबा, यामध्ये कोण मुख्यमंत्री होते? कुणाला कोणते मंत्रिपदे मिळतात? आणि मराठा आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेतात? याकडे माझं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे मी माझ्या मराठा समाजासाठी उपोषणावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT