Manoj Jarange Patil SaamTv
Video

Jalna News : मनोज जरांगेंचे तिसऱ्या आघाडीबद्दल महत्वाचे विधान

Manoj Jarange : संभाजीराजेंनी रविवारी अंतरावली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेत तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव दिल्याचे माध्यमांना सांगितले होते. त्यावर आता मनोज जरांगे यांनी या तिसऱ्या आघाडीच्या चर्चेबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

Saam Tv

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माजी खासदार सांभाजीराजे छत्रपती यांचं म्हणणं खोडून काढत 'संभाजीराजे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव देण्यात आलेला नाही', असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या चर्चा कितपत खऱ्या याबद्दल राजकीय गोट्यात चर्चा रंगल्या आहेत.

रविवारी संभाजीराजेंनी अंतरावली सराटीत जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांना तिसऱ्या आघाडीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र संभाजीराजे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे सांगत मनोज जरांगे यांनी आता संभाजीराजे यांचे म्हणणे खोडून काढले आहे. 'गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. राज्यातले लोक व्यथित आहे. त्यांनी एकत्र यायला हवे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकरी, कामगार आणि वंचित घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी हा तिसरा प्रयत्न असल्याचे माजी खासदार संभाजीराजे यांनी मध्यमांशी बोलताना सांगितले होते. मात्र मनोज जरांगे यांनी याबद्दल स्पष्टीकरण देताना चर्चा केवळ मराठा अरक्षणावर झाली. यात कुठेही तिसऱ्या आघाडीवर बोलण झालं नसल्याचं सांगितल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree Tips : फक्त ५ मिनिटांत चापूनचोपून साडी नेसाल; 'ही' स्मार्ट ट्रिक वापरा, समारंभात मस्त मिरवा

Sanjay Dutt : सोनं, लाखोंचं घड्याळ अन् बरंच काही; संजय दत्तला पाकिस्तानी चाहत्याकडून महागड्या भेटवस्तू

Maharashtra Live News Update : राज्यावर अवकाळीचे सावट; 17 ते 20 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

Accident News : रोजा सोडला, चहा पिण्यासाठी निघाले पण वाटेतच काळाने घातला घाला, सोलापूरमध्ये २ मित्रांचा अपघाती मृत्यू

PM Ujjawala Yojana: लाडक्या बहि‍णींच्या पदरी निराशाच! गॅस सब्सिडीसाठी ४५ दिवसांची अट, अन्नपूर्णा योजनेचा निर्णय फक्त कागदावरच

SCROLL FOR NEXT