Agriculture Minister Manikrao Kokate caught on camera playing online rummy during monsoon session of Maharashtra Assembly. Saam Tv
Video

Manikrao Kokate: रम्मीचा डाव उलटणार; माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद जाणार? VIDEO

Will Manikrao Kokate resign? मंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशनात रम्मी खेळताना आढळले. व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली. विरोधकांचा रोष वाढला असून मंत्रीपद धोक्यात असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून समोर येत आहे.

Omkar Sonawane

सरकारी कोट्यातून फ्लॅट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आणि वादग्रस्त विधानामुळे या आधी अनेकदा अडचणीत सापडलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तथा सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे नव्या वादात सापडले आहेत. आताच संपलेल्या पावसाळी अधिवेशानामध्ये विधानसभा सभागृहात कामकाज सुरू असताना कोकाटे यांचा मोबाइलवर रमी हा पत्त्यांचा ऑनलाईन गेम खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता.

हा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असताना कृषिमंत्र्याचा हा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल हे निर्णय घेतील असे सुतोवाच केल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो अशी राजकीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhad Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT