Washim Flood Rain Updates saam tv
Video

Flood Video : पुराच्या पाण्यातून वाट काढत होता, बघता बघता वाहून गेला तरूण; थरारक व्हिडिओ

Washim Flood Video : वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. एक तरूण पुराच्या पाण्यातून वाट काढताना वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

वाशिम जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. नद्या ओसंडून वाहत आहेत. पुराच्या पाण्यातून नागरिकांकडून वाट काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक तरूण पुराच्या पाण्यातून वाट काढत होता. त्याचवेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यात तोल गेल्यानं तरूण वाहून गेला.

जिल्ह्यात पूरस्थिती

वाशिममध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय. जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. यात बाळखेड गावाजवळच्या नाल्याला पूर आल्यानं महागाव- बाळखेड रस्ता बंद झालाय. रिठद गावाजवळच्या नदीला पूर आल्यानं दोन दिवसांत तिसऱ्यांदा गावाचा संपर्क तुटला.

गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्यानं रिसोड तालुक्यातील कुकसा प्रकल्प तुडुंब भरला आहे. धरण ओव्हर फ्लो झालं आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी धरणाजवळ सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणं टाळावे, असे आवाहन धरण प्रशासनानं केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

कोणत्या भाज्यांमध्ये टॉमेटोची प्युरी घालू नये, बेचव होईल भाजी

Sleeveless top fashion tips: तुमच्यासाठी कोणता टॉप परफेक्ट? स्लिव्हलेस की फुल स्लीव्ह्ज...ही एक सोपी ट्रिक करेल तुमची मदत

Mumbai : ठाकरे बंधूंचा महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार, भाजपने सोडला टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT