मालाड पूर्व पठाण वाडीत शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. यावेळी संजय निरुपम यांनी खुर्ची आणि टेबल फेकले. संजय निरुपम म्हणाले की, उबाठा शिवसेनेचे मुस्लिम कार्यकर्ते काही लोकांना जबरदस्तीने उबाठा शिवसेनेला मत देण्यासाठी घेऊन जात होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.