Mahayuti Politics Saam TV
Video

Mahayuti News: महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी महायुतीचं जागावाटपाची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये बैठकावर बैठका सुरु आहे. लोकसभेमध्ये ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्याचा फटका बसला होता, पण तो धोका टाळण्यासाठी महायुतीकडून लवकरच उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असे बोलले जात आहे.

महायुतीचं जवळपास ८० टक्के जागावाटप पूर्ण झाले आहे. काही जागांवर पेच आहे, त्यासाठी बैठका होत आहे. महायुतीकडून नवरात्रीमध्ये ४० उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक १० ते २० नोव्हेंबर यादरम्यान दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून पहिली यादी नवरात्रीमध्ये येण्याची शक्यता आहे. ४० जागांची यादी समोर येईल.

भाजप १६० जागा लढण्यासाठी आग्रही आहे. तर एकनाथ शिंदे यांना १०० आणि अजित पवार यांना ७० जागा हव्यात. यावर तोडगा काढल्यानंतर ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT