Uday Samant praises BJP leader Ravindra Chavan in Ratnagiri Saam Tv
Video

महायुतीत चाललंय काय? उदय सामंतांकडून चव्हाणांचे कौतुक|VIDEO

Uday Samant Praises BJP Leader Ravindra Chavan: रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कौतुक केले. कोकणातील यशस्वी नेतृत्त्व आणि पहिल्या प्रचाराबद्दल सामंत यांनी अभिमान व्यक्त केला, ज्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Omkar Sonawane

दिल्लीत एकीकडे एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्या कारभाराविरोधात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रारी केल्या जात असताना दुसरीकडे रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कौतुक केले आहे. सामंत म्हणाले, कोकणातील एक सहकारी जगातील मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बसला याचा आम्हाला अभिमान आहे. शिवसेनेचे नेते कुमार निकम यांनाही याचा अभिमान वाटत असल्याचे सामंत यांनी नमूद केले. केवळ युती करणे महत्त्वाचे नाही, तर ती टिकली पाहिजे आणि प्रत्येक नगरपालिका-नगरपरिषदेवर तिचा प्रभाव पडला पाहिजे, असेही ते म्हणाले. रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रातला पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केल्याचे सांगत सामंत यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : चिमुकल्याच्या जखमेवर टाक्यांऐवजी लावलं फेविक्विक, डॉक्टरचं भयंकर कृत्य, नेमकं काय घडलं?

राजकारणातली सर्वात मोठी बातमी! भाजप आणि काँग्रेसची युती|VIDEO

पुण्यातलं राजकारण फिरणार, अजित पवारांचे १० नेते भाजपच्या गळाला?

Maharashtra Live News Update: प्रलंबित प्रश्नांसाठी प्राध्यापकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार

Vangyache Kaap Recipe: वांग्याची भाजी खाऊन कंटाळलात? झटपट बनवा कुरकुरीत काप

SCROLL FOR NEXT