Raut supporters celebrating after winning all 18 seats in the Barshi APMC elections. Saam Tv
Video

इकडे अधिवेशन सुरू आणि तिकडे राऊतांचा भाजपसाठी मोठा डाव, सर्व १८ जागांवर कब्जा, शिवसेनेच्या गटाचा सुफडा साफ|VIDEO

Raut Group Wins All 18 Seats: बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या भाजप समर्थित गटाने सर्व १८ जागांवर दणदणीत विजय मिळवत सोपल गटाचा सुफडा साफ केला.

Omkar Sonawane

सोलापूर: बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार तथा भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्या गटाने ऐतिहासिक विजयी पताका फडकावला आहे. 18 पैकी सर्व 18 संचालक जागांवर विजयी होत राऊत गटाने आ. दिलीप सोपल गटाचा सुफडा साफ केला आहे.

यंदा बार्शी APC निवडणुकीत तब्बल 96.98 टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान राऊत आणि सोपल गटांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र मतमोजणीअंती संपूर्ण बाजार समितीवर राऊत गटाने कब्जा मिळवत बार्शीमध्ये जल्लोष सुरू झाला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी फटाके, ढोल-ताशांच्या गजरात विजयानंतर मोठा उत्सव साजरा केला.

यावेळी राऊत म्हणाले, बार्शीच्या सर्व मतदारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आम्ही दिलेला विकासाचा शब्द पूर्ण केला आणि त्याच विश्वासामुळे सर्व 18 जागांवर विजय मिळाला. आगामी काळात बाजार समितीचा सर्वांगीण विकास प्रामाणिकपणे करत राहू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

Gold vs Diamond Mangalsutra: कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र दिसेल अधिक रेखीव?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो दरम्यान इमारतीवरील टावरला भीषण आग.....

लाडक्या बहिणींनो कमळाला मदत करा, मगच नवऱ्याला जेवण वाढा; भाजपच्या महिला मंत्र्याचा अजब सल्ला

मासिक पाळीच्या वेळी महिलांमध्ये सेक्सची इच्छा का वाढते? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT