supriya sule  Saam tv
Video

'....यासारखा दुसरा विनोद नाही', कोकाटेंना क्रिडा खाते देताच, बड्या खासदाराकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून प्रहार

Maharashtra Politics: मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. कृषी खातं काढून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभाग सोपवला. सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका.

Bhagyashree Kamble

  • मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल.

  • कृषी खातं काढून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभाग सोपवला.

  • सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका.

सभागृहात मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर विरोधकांनी त्यांच्या कृषीमंत्रिपदाचा राजीनामा मागितला होता. दरम्यान, आता माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, दत्तात्रय भरणे यांची राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. 'एकीकडे तरूण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. रमीवर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच, कोकाटेंना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रिडा आणि युवक कल्याणसारखे महत्वाचे खाते देण्यात आले आहे. यासारखा दुसरा विनोद नाही', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health And Weight Loss: साठीत असताना तिशीतील सौंदर्य आणि फिटनेस हवी? मग या ३ गोष्टी फॉलो करा

Maharashtra Live News Update: काँग्रेसला सोबत घ्या, राज ठाकरेंची इच्छा

लेकीच्या प्रेम विवाहाला कडाडून विरोध, जावईच्या आईला जिवंत जाळलं, मुलीच्या आई - वडिलांचा प्रताप

खळबळजनक! निवडणुकीआधी महाराष्ट्रातील मतदार यादीत घोळ, एकाच पत्त्यावर तब्बल २०० जणांची नोंद

Toothpaste Scam Alert : तुम्ही बनावट टूथपेस्ट तर वापरत नाही? कारण आले समोर, वाचा नेमकं प्रकरण काय आहे

SCROLL FOR NEXT