Raj Thackeray Announced Candidate Saam Tv
Video

Maharashtra Politics: विधानसभेसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा कायम; २ बडे नेते उतरवले रिंगणात, पाहा VIDEO

Rohini Gudaghe

मुंबई : मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवडीमधून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमध्ये दिलीप धोत्रे यांना मैदानात उतरवल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलीय. विधानसभेसाठी राज ठाकरेंनी मिशन महाराष्ट्र सुरू केलंय, तर सोलापूरमधून त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याची आज सुरूवात केलीय. मनसेनं विधानसभा स्वबळावर लढवल्याचं ठरवलं आहे, तर याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी दोन उमेदवारांची घोषणा देखील केलीय.

या विधानसभा निवडणुकीत २२५ पेक्षा जास्त जागा लढवण्याचा निर्धार आहे. बाळा नांदगावकर २००९ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकलेले होते, तर आता शिवडीमध्ये बाळा नांदगांवकर विरूद्ध ठाकरे गटाचे अजय चौधरी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तर पंढरपूरमध्ये दिलीप धोत्रे विरूद्ध भाजपचे समाधान आवताडे अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. मागील दोन पंचवार्षिकपासून अजय चौधरी शिवडीत आमदार आहेत. दिलीप धोत्रे यांनी २००४ साली मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. राज्यात सर्व राजकीय पक्षांना जनता कंटाळलेली आहे, त्यामुळे निश्चितच मनसेचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT