Uddhav Thackeray Tiger Operation Eknath Shinde News AI Image
Video

Political News : ठाकरे सेनेत पुन्हा फूट पडणार, शिंदे गटातील आमदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरमुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. संजय गायकवाड यांनी ऑपरेशन टायगर कधीही होऊ शकते, असे संकेत दिले असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Alisha Khedekar

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षफुटीच्या चर्चांना वेग आला आहे. शिंदेसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी ऑपरेशन टायगरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. येत्या काळात ऑपरेशन टायगर कधीही होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील काही नेते शिंदेसेनेत प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संजय गायकवाड यांनी सांगितले की, शिवसेना पक्षाचा विस्तार करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने काम करत आहेत. पक्ष मोठा करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेची ताकद आणखी वाढलेली दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच ऑपरेशन टायगर ही प्रक्रिया थांबणारी नसून भविष्यातही पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार का, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील काही नेते शिंदेसेनेच्या संपर्कात आहेत का आणि आगामी काळात कोणते राजकीय बदल घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे ग्रँड टूर यंदाही भव्य आणि जागतिक दर्जाची होणार; स्पर्धेच्या तयारीला वेग द्या – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Trisha Krishnan Politics: मुख्यमंत्री विजय यांच्यानंतर आता त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? जयललितांशी होतेय तुलना!

Vehicle Insurance : वाहन विम्याचे होणार ४ भाग! १५ डिसेंबरपासून नवा नियम लागू; वाहनमालकांसाठी काय बदलणार?

राजकारणात मोठा भूकंप! 3 आमदार राजीनामा देणार?

हिंदू धर्मात वधू लग्नानंतर लाल बांगड्या का घालतात? हिरव्या-पिवळ्या का नाही? काय आहे पारंपरिक महत्त्व

SCROLL FOR NEXT