Dhananjay munde and Walmik Karad 
Video

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची उणीव भासतेय? जाहीर सभेत म्हणाले...; पाहा VIDEO

Dhananjay Munde And Walmik Karad: धनंजय मुंडे यांनी बीडमधील एका सभेमध्ये भाषण करताना वाल्मिक कराडचे नाव न घेता आठवण काढली. या मंचावर मला एक व्यक्ती नसल्याची जाणीव भासत आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Priya More

बीडच्या परळीतील कार्यक्रमातून धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आरोपी वाल्मीक कराड याची उणीव भासत असल्याचे सांगितले. काय चुकलं काय नाही चुकलं हे न्यायालय बघेल. आज एका व्यक्तीची व्यासपीठावरती कमतरता भासते, असे धनंजय मुंडे म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

परळीतील नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज परळीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी बोलत असताना भाषणाच्या शेवटी म्हटले की, आज परळीतील जगमित्र कार्यालय गेल्या ६ ते ९ महिन्यापासून आजही सर्वसामान्य जनतेसाठी खुलं आहे. मात्र आज या मंचावर मला एक व्यक्ती नसल्याची जाणीव भासत आहे. ती व्यक्ती आज आपल्यात नाही. जे काही असेल नसेल ते न्यायालय पाहील. काय व्हायचे ते होईल. मात्र त्या व्यक्तीची आज जाणीव भासत आहे.', असं धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालकाचा माज काही तासांतच उतरला; कान पकडून मागितली माफी

Mirchi Vada: नाश्त्याला वडापाव कशाला? घरगुती अन् राजस्थान स्टाईल कुरकुरीत मिरची वडा ठरेल बेस्ट ऑप्शन

१० मिनिटांत सोलून होतील किलोभर वाटाणे, फक्त ६ स्टेप्स; जाणून घ्या स्मार्ट ट्रिक

Karnataka Politics : सत्तासंघर्ष पेटला! मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार? कर्नाटकात 'डीके बॉस'!

Maharashtra Live News Update : देवळीतील भाजपाची विजय संकल्प सभा

SCROLL FOR NEXT