आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी नेहमीप्रमाणे विरोधकांनी पायऱ्यांवर उभे राहून हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन केले. तसेच सत्ताधाऱ्यांनीही उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन केले. या दरम्यान रोज एकमेकांवर टीका करणारे नेते एकमेकांना गळाभेट घेताना दिसले. अशातच विधान भवन परिसरात कट्टर राजकीय शत्रू एकत्र दिसले. आमदार अनिल परब, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांच्यात गप्पा रंगताना दिसल्या. त्यानंतर अनिल परब आणि मंत्री संजय शिरसाट यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. त्यांच्यासोबत लिफ्टमध्ये मंत्री अदिती तटकरे या देखील होत्या. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.