राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
मंत्री छगन भुजबळ हे काल पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत आपले मत मांडले. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर आणि नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांनी भविष्यात राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. राज्याच्या सर्वोच्च पदावर त्यांना पाहायला आवडेल, असेही भुजबळ म्हणाले. भुजबळ यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सुनेत्रा पवार यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.