State Election Commission officials during a video conference with municipal and divisional commissioners regarding upcoming civic elections in Maharashtra. Saam Tv
Video

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

State Election Commission: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं तयारीला सुरुवात केली आहे.

Omkar Sonawane

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान आयोगाने निवडणूक प्रक्रियेच्या तयारी संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (EVM) प्राथमिक तपासणी तातडीने पार पाडण्यात यावी, तसेच ही यंत्रे पूर्णपणे कार्यान्वित स्थितीत ठेवावीत, अशा स्पष्ट सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्यभरातील महापालिकांमध्ये निवडणुकीचा बिगुल कधी वाजतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने केलेल्या हालचालींमुळे निवडणूक प्रक्रियेचा मार्ग मोकळा होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia Alliance Opposition : घातक युती, युद्धाची सावली; चार देश एकत्र येणार,रशियाला घेरणार, VIDEO

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

SCROLL FOR NEXT