Ajit pawar News  Saam tv
Video

Video : निवृत्तीनंतर पेन्शन मिळाली पाहिजे, अधिवेशनात अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar on pension : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पेन्शनबाबत मोठं भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : विधीमंडळात सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेन्शबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'निवृत्तीनंतर पेन्शन मिळाली पाहिजे, सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.

राज्यातील निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांच्या पेन्शनबाबत अजित पवार म्हणाले, 'केंद्र सरकारने याबाबत माहिती मागितली आहे. राज्य सरकारचा किंवा निम शासकीय कर्मचाऱ्यांचं आयुष्य आणि त्यांचं कुटुंब व्यवस्थित राहण्यासाठी पेन्शन मिळालं पाहिजे. त्याबद्दल दुमत नाही. परंतु त्यांच्या पेन्शनबाबत तीन जणांची कमिटी आहे. या कमिटीत निवृत्त अधिकारी आहेत'.

'या कमिटीने वेगवेळ्या कमिटीशी चर्चा केली. त्यानंतर हा प्रस्ताव पुढे आला. त्यानंतर आम्ही मान्यता दिली. राज्य सरकारने त्याबाबत निर्णय घेतला आहे. आता हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या अधिकाऱ्यांच्या पगाराची १० टक्के, सरकारची १४ टक्के अशी मोठी रक्कम मिळेल. देशातील काही राज्यात निवडणूक सुरू असताना पेन्शनबाबतची घोषणा करण्यात आली. आम्ही त्यांच्याकडूनही मागणी मागितली. त्यांनी अजून माहिती दिलेली नाही. हे सरकार देखील कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे. आमचं सरकार त्यांना वाऱ्यांवर सोडणार नाही. सरकार त्यांना न्याय देईल,असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सातपुड्यात पाऊस, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT